Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मुख्यमंत्रीपद हे शिंदेंच्या बेईमानाचं बक्षिस...' कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तीवाद; भावनिक आवाहनाने शेवट

Kapil Sibal: महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर झाल्याचेही त्यांनी आपल्या युक्तीवादात अधोरेखित केले.

Prachee kulkarni

Maharashtra Political Crisis Hearing: राज्याच्या सत्ता संघर्षातील सुणावणी आता अंतिम टप्प्यात आला आहे. आजच्या दिवसाच्या कामकाजात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्वाचा युक्तीवाद मांडला. या युक्तीवादात त्यांनी एकनाथ शिंदे आणि राज्यपालांच्या सत्तास्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर झाल्याचेही त्यांनी आपल्या युक्तीवादात अधोरेखित केले. (Maharashtra Politics)

काय होता सिब्बल यांचा युक्तीवाद...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडले. शिंदे यांनी सरकार पाडल्यामुळेच त्यांच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही. पण सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आला. राज्यपाल हे विधीमंडळ पक्षाशी संवाद ठेवू शकतात. वैयक्तिक कोणाशीही नाही. पक्षातील अंतर्गत वादाकडे राज्यपाल लक्ष देऊ शकत नाही. राज्यपाल कोणा एकाला तुम्हीच आता मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही, राज्यपालांनी शिंदे यांच्या बाबतीत तेच केलं, असे कपील सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले.

बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. आधी सांगितलं आम्हीच शिवसेना, नंतर सांगितलं पक्षप्रमुखांना कंटाळून बाहेर पडलो. मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडलं. शिंदेंच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं, असंही सिब्बल यांनी सांगितलं.

हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक असा प्रसंग आहे, जेव्हा लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला याची खात्री आहे, की या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपण, आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा”, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

विवाहितेची आत्महत्या की घातपात? कॉल रेकॉर्डिंगने उघडले गुपित, नेमकं काय घडलं?

Rajbhog sweet recipe: झटपट, पटापट...घरच्या घरी बनवा राजभोग मिठाई

SCROLL FOR NEXT