Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Kalyan News : विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी एमएसईबी कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: ग्राहकांची अरेरावी करण्यासाठी कायम चर्चेत असलेले महावितरणचे कर्मचारी पुन्हा वादात सापडले आहेत. कल्याण येथे पत्री पूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. या महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक झाड झुकलेले आहे. हे झाड हटविण्यासाठी वीज पुरवठा खंडित करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. 

कल्याणमधील पत्री पूल परिसरात असलेल्या सदर पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी एमएसईबी कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी करत टाळाटाळ केली आहे. यामुळे साधे काम करण्यासाठी देखील पैसे द्यावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नागरिक पोहचले महावितरण कार्यालयात 

दरम्यान, ही बाब समजताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले. घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती तसेच व्हिडिओ का काढताय, पोलिसांना बोलावतो अशा धमक्या दिल्या. 

त्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी 

मात्र सदरच्या या प्रकरणामुळे महावितरण कर्मचारी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून एका गरोदर महिलेच्या सुरक्षिततेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच दोषी महावितरण अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT