Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Badlapur News : राज्यात चांगला पाऊस झाल्याने नद्या- नाल्यात पाणी प्रवाहित झाले आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होऊन धरणाचे बंधारे प्रवाहित झाले आहेत. अशा ठिकाणी काही जण फिरण्यासाठी येत आहेत
Bhoj Dam
Bhoj DamSaam tv
Published On

मयुरेश कडव
बदलापूर
: धरण परिसरात फिरण्यासाठी गेले असताना धरणात मस्ती करणे एका पर्यटकांचा अंगाशी आले होते. मस्ती करण्याच्या नादात धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात पर्यटक अडकल्याची घटना बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर घडली. सुदैवाने या पर्यटकाला त्याच्या मित्रांच्या मदतीने वाचविण्यात यश मिळाले आहे. 

राज्यात चांगला पाऊस झाल्याने नद्या- नाल्यात पाणी प्रवाहित झाले आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होऊन धरणाचे बंधारे प्रवाहित झाले आहेत. अशा ठिकाणी काही जण फिरण्यासाठी येत आहेत. मात्र हे फिरणे कधी कधी जीवावर बेतते. अशाच प्रकारे बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यात पाण्याची मस्ती एका पर्यटकाच्या चांगलीच अंगलट आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Bhoj Dam
Amravati Accident : पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू

बदलापूर जवळील कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाच्या बाजूला भोज धरण आहे. भोज धरणाच्या बंधाऱ्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येत असतात. मात्र पाण्याचा अंदाज नसतानाही काही पर्यटक या बंधाऱ्यावर मस्ती करतात आणि हीच मस्ती त्यांच्या जीवावर बेतते. अशाच काही प्रकार घडला असून सुदैवाने या पर्यटकाचा जीव वाचला आहे. 

Bhoj Dam
Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

मित्रांच्या तत्परतेने वाचला जीव 

मस्ती करण्याच्या नादात हा पर्यटक प्रवाहातच अडकला. आपला जीव वाचवण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला. त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. एकाने बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला. तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढलं. अखेर या पर्यटकाची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com