Raju Patil News Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil News: बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरा; मनसे आमदार राजू पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Kalyan News : बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरा; मनसे आमदारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: आमदार, नेत्याचा वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून शुभेच्छाचे बॅनर शहरभर लावले जातात. परंतु (Kalyan) माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करू नका. जमल्यास बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरा; असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. आमदारांचा आवाहनाचा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन दिले होते. खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा (KDMC) व हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. मात्र रस्त्यावरील खड्डे पाहता आयुक्तांचे हे आश्वासन देखील हवेतच विरल्याचे दिसून येतेय. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आता राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्र घेतला. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्डे प्रश्नी महापालिकेसह सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. राजू पाटील यांनी केलेले पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली.

सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून आमदार राजू पाटील यांनी अनेक ठिकाणी विविध पक्षांचे कार्यक्रम व शुभेच्छांचे बॅनर लागले त्यात मला शुभेच्छा देणाऱ्या बॅनरची भर टाकून शहराचे परिसराचे विद्रुपीकरण करू नका. त्यापेक्षा जमल्यास एका बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरला, तर मला व तुम्हालाही जनता आशीर्वाद देईल असे आवाहन केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी आवाहन केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात महायुतीत तणावाचे संकेत, जिल्हाध्यक्षांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

Maharashtra Politics: काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजप प्रवेश लांबणीवर, स्वत:च सांगितलं कारण...

मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

SCROLL FOR NEXT