Khed Pune News: गणपती डोकेरेशनने आग; तरुणाचा झोपेतच दुर्दैवी मृत्यु

Pune News : गणपती डोकेरेशनने आग; तरुणाचा झोपेतच दुर्दैवी मृत्यु
Khed Pune News Electric Shock
Khed Pune News Electric ShockSaam tv
Published On

खेड (पुणे) : गणेशोत्सव साजरा होत असून घरगुती बाप्पाचे देखील आकर्षक सजावट करून स्थापना करण्यात आली आहे. (Ganesh Festival) परंतु गणपतीसाठी केलेल्या आरासच्या लाईटिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खेड (Khed) तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. (Breaking Marathi News)

Khed Pune News Electric Shock
Sangli News: गणपतीच्या डोळ्यातून अश्रू; भाविकांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी

गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरगुती गणपतीला आकर्षक सजावट (Ganapati Decoration) केली जात आहे. या सजावटीमध्ये विद्युत लाईट, प्लास्टिक फुले, कपड्यांचा वापर अधिक वाढलाय. यावेळी विद्युत लाईनची कुठलीही सुरक्षा लक्षात घेतली जात नाही. यातुनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

Khed Pune News Electric Shock
Gondia News: नागपुर - रायपुर महामार्ग अखेर मोकळा; १८ तासापासून वाहतुक होती ठप्प, वाहन चालकांचे हाल

झोपेतच मृत्यू 
वैभव गरुड असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव गरुड यांच्या रहात्या घरात घरगुती गणपतीला विद्युत रोषणाईसह कापडी आकर्षक सजावट करण्यात आली होती. दरम्यान रात्रीच्या वेळी अचानक विद्युत लाईनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये वैभव या तरुणाला झोपेतच शॉक (Electric Shock) लागला. यावेळी लागलेल्या आगीत गणपतीची सजावट जळुन खाक झाली. यामध्ये वैभवचाही दुदैवी मृत्यु झाला. या दुदैवी घटनेमुळे खेड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असुन राजगुरुनगर पोलीसांत आकस्मित मृत्यु नोंद करण्यात आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com