Sangli News: गणपतीच्या डोळ्यातून अश्रू; भाविकांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी

गणपतीच्या डोळ्यातून अश्रू; भाविकांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी
Sangli News Ganesh Festival
Sangli News Ganesh FestivalSaam tv
Published On

सांगली : सध्या गणेशोत्सव सुरु आहे. या दरम्यान गणेश मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची बातमी पसरली व गावात भाविकांनी एकच गर्दी केली. हा प्रकार (Sangli) सांगली जिल्ह्यातील शिराळा (Ganesh Festival) तालुक्यातील चिंचोली येथे शनिवारी सकाळी घडला असून वार्ता पसरताच भाविकांची एकच गर्दी उसळली. (Latest Marathi News)

Sangli News Ganesh Festival
Rain Forecast : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

शिराळा तालुक्यातील चिंचोली गावातील बापू जाधव यांच्या घरी परंपरेने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षीही श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रथेप्रमाणे करण्यात आली. नित्याप्रमाणे पूजा करत असताना डोळ्यात चमक दिसली. ही चमक म्हणजे गणेशाचे अश्रूच असल्याचा समज झाला. काही भाविकांनी कापसाच्या बोळ्याने डोळे टिपून पाहण्याचा प्रयत्नही केला.

आजूबाजूला जमलेल्या लोकांनीही याला दुजोरा दिला. यामुळे गणपतीच्या डोळ्यात अश्रू आल्याची अफवा वाऱ्याच्या गतीने पसरली. यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी धावले. महिलांनीही मोठी गर्दी केली. 

Sangli News Ganesh Festival
Saamana Editorial: 'जुन्या संसदेत १० वर्षांपेक्षा जास्त काळ कोणी टिकत नव्हतं; म्हणून नवी संसद..' सामनातून भाजपवर टीकास्त्र

अंनिसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

मात्र हा प्रकार प्रकाशाच्या परार्तनाचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र श्रध्दाळू हे मान्य करायला राजी नव्हते. हा प्रकार अंधश्रध्देचा असून वैज्ञानिक तथ्य लक्षात घेता असे घडणे अशक्य आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याविरुध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसचे कार्यकर्ते राहूल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस.के.माने आदींनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com