Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : इमारतीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग; नागरिकांची धावपळ

Kalyan News : कल्याण पश्चिमेच्या राधानगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवर खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. या मोबाईल टॉवरला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली.

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याणमध्ये एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याची घटना घडली. (Kalyan) आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरलेत. आगीनंतर (Fire) इमारतीतील नागरिकांची धावपळ सुरु झाली होती. (Breaking Marathi News)

कल्याण पश्चिमेच्या राधानगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवर खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर (Mobile Tower) आहे. या मोबाईल टॉवरला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहाटेच डोंबिवलीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात आगीची ही दुसरी घटना कल्याण डोंबिवली परिसरात घडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांची धावपळ 

दरम्यान उमरतीवरील टॉवरला आग लागल्याने या इमारतीमधील नागरिक भयभीत होऊन बाहेर पडले होते. येथील रहिवाशांनी (Fire Brigade) आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. या नंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाले नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढवतात 'हे' 4 पदार्थ; निरोगी हृदयासाठी कधीच खाऊ नका

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

SCROLL FOR NEXT