Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण; सीसीटीव्ही जतन करण्याचे पोलिसांना आदेश; उच्च न्यायालयात याचिका दाखल

Kalyan Crime : धूप जाळण्याच्या कारणावरुन १८ डिसेंबरच्या रात्री वाद झाला वादात मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी बाहेरुन लोकांना बोलावून शेजारी राहणारे देशमुख यांच्यासह काही जणांना मारहाण केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पोलिसांना घटनेच्या दोन दिवसांचा सीसीटीव्ही जतन करुन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणात आता २० जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. आत्ता न्यायालया पुढील सुनावणीत काय आदेश देणार याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील अमजेरा हाईट या उच्चभ्रू सोसायटीत धूप जाळण्याच्या कारणावरुन १८ डिसेंबरच्या रात्री माेठा वाद झाला होता. या वादात मंत्रालयातील अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी बाहेरुन काही लोकांना बोलावून शेजारी राहणारे अभिजीत देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह काही जणांना मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यावर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

दरम्यान या प्रकरणात अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता यांच्यासह अन्य पाच जणांना अटक केली होती. अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात पर्यटन विभागात कार्यरत असल्याने गाडीवर दिवा लावून फिरत होता, असे आरोप झाले होते. घटनेनंतर अखिलेश शुक्ला याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पिडीत कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी धीरज देशमुख यांनी याचिका दाखल केली आहे. 

दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश 

न्यायालयाने याचिकाकर्ता याची बाजू ऐकून घेतले आहे. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. तसेच गुन्ह्यातील मारेकऱ्यांनी पेलिस स्टेशनपर्यंत जखमीचा पाठलाग केला असून या प्रकरणातील सर्व मारकऱ्यांचा सीडीआर तपासण्यात यावा. या प्रकरणातील अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. सर्व आरोपीविरोधात मकोका अंतर्गंत कारवाई करण्यात यावी. तर उच्च न्यायालयाने घटनेच्या दिवशी म्हणजे १८ आणि १९ डिसेंबरचा सीसीटीव्ही जतन करुन ठेवावा असे आदेश कल्याण पोलिसांना दिले आहेत; अशी माहिती याचिकर्ता यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT