Sand Mafia : अवैध वाळू उपसा; जालन्यात १५ जणांवर गुन्हा दाखल, शंभर ब्रास वाळू जप्त

Jalna News : जालना जिल्ह्यातील गोंदी येथे गोदावरी नदीतून वाळूचा उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. यावरून पथकाने सदर ठिकाणी धाड कारवाई
Sand Mafia
Sand MafiaSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: अवैध वाळू उपशाचा प्रश्न सध्या गंभीर बनत चालला आहे. या विरोधात महसूल विभागाने देखील कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार जालन्यात गोंदी येथील गोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता. याठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत शंभर ब्रास वाळू जप्त केली आहे. तसेच उपसा करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून वाळू उपसा करण्याचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशातच जालना जिल्ह्यातील गोंदी येथे गोदावरी नदीतून वाळूचा उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. यावरून पथकाने सदर ठिकाणी धाड कारवाई करत १०० ब्रास वाळू जप्त केली आहे. 

Sand Mafia
Fraud Case : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे सांगत १७ तरुणांची दीड कोटीने फसवणूक; शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

१५ जणांवर गुन्हा दाखल 

गोदावरी नदीतून केनीचा वापर करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या १५ व्यक्तींविरोधात जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत जवळपास १०० ब्रास वाळू देखील जप्त करण्यात आली आहे. महसूल पथकाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. अंबडचे नायब तहसीलदार विवेक उढान यांच्या फिर्यादीवरून संघटितरित्या वाळू चोरी केल्याप्रकरणी तब्बल १५ वाळूमाफिया विरोधात जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Sand Mafia
Kalyan Crime : वृद्धाला रेल्वे ट्रॅकवर नेत मारहाण करत लुटले; खडावली रेल्वे स्थानकाजवळची घटना, दोघांना घेतले ताब्यात

चंद्रभागेत वाळु चोरांचा धुडगूस
पंढरपूर
: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागेत वाळू चोरांनी अक्षरशः धूडगूस घातला आहे. चंद्रभागेच्या पात्रातून बेसुमार अवैध‌‌ वाळू उपसा केला‌ जात असल्याने चंद्रभागेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. चंद्रभागेच्या पात्रातून सध्या गाढवांचा वापर करून अवैध‌ वाळू उपसा व‌ वाहतूक केली जात आहे. दिवसा ढवळ्या चंद्रभागेचे लूट केली जात असताना पोलिस आणि महसूल प्रशासन मात्र गप्प आहे. चंद्रभागेच्या पात्रातून बेकायदेशीरपणे सुरू असलेला‌ वाळू उपसा थांबावा अन्यथा महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा समाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com