Kalyan Crime : वृद्धाला रेल्वे ट्रॅकवर नेत मारहाण करत लुटले; खडावली रेल्वे स्थानकाजवळची घटना, दोघांना घेतले ताब्यात

Kalyan News : खडावली परिसरात राहणारे अनंत नांदलकर हे काही दिवसापूर्वी कामानिमित्ताने बाहेर गेले संध्याकाळी ते पुन्हा खडवली स्टेशनला आले. खडवली रेल्वे स्टेशनला उतरताच त्यांना दोन तरुण त्यांना भेटले
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: खडावली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर नेऊन ७० वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाण करून त्या वृद्धाकडील सोन्याची चैन व मोबाईल घेऊन दोनजण पसार झाले होते. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून लुटणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील एकजण कचऱ्याचा घंटा गाडीवर तर दुसरा मिठाई दुकानात काम करत असल्याचे समोर आले. 

खडावली परिसरात राहणारे अनंत नांदलकर हे काही दिवसापूर्वी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. संध्याकाळी ते पुन्हा खडवली स्टेशनला आले. खडावली रेल्वे स्टेशनला उतरताच त्यांना दोन तरुण त्यांना भेटले. त्या दोघांनी अनंत यांना बोलण्यात गुंतवून रेल्वे स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर घेऊन गेले. दोघांनी त्यांच्या जवळील महागडी सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावून घेतला. अनंत यांनी यावेळी प्रतिकार केला. मात्र दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. 

Kalyan Crime
Nandurbar Crime : मुलीने घरी बोलावत शिक्षकासोबत केला भयानक प्रकार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी

बेशुद्ध अवस्थेत फेकले रेल्वे ट्रॅकवर 

मारहाणीत अनंत हे गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बेशूद्ध अवस्थेत सोडून त्यांच्या खिशातील पर्स काढून दोघे पसार झाले होते. काही नागरीकांनी अनंत यांना रुग्णालयात दाखल केले. कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिस अधिकारी पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके या प्रकरणाचा तपास करीत होते. 

Kalyan Crime
Fraud Case : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे सांगत १७ तरुणांची दीड कोटीने फसवणूक; शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

सीसीटीव्हीच्या आधारे शोध 

खडवली स्टेशनला असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्या तरुणांची ओळख पटली. पोलिसांनी दोघांचा शोध सुरु असता अखेर कल्याणनजीक विठ्ठलवाडी परिसरातून शंकर शिरसाट आणि नरेंद्रसिंग गौतम या दोघांना अटक करण्यात आली. दोघांकडून पाेलिसांनी चोरलेल्या वस्तू देखील हस्तगत केल्या आहेत. या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारे आणखी किती लोकांना लूटले आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com