Bogus Cement Saam tv
महाराष्ट्र

Bogus Cement : निकृष्ट दर्जाचे सिमेंट नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्री; कल्याण पूर्वमध्ये बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश

Kalyan News : सिमेंट बनविण्याच्या कंपनीतून बनावट सिमेंट तयार करून नावाजलेल्या कंपनीच्या सिमेंट पिशवीत पॅकिंग करण्याचे काम केले जात होते. या ठिकाणाहून ते वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जात होते

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे
कल्याण
: कल्याण पूर्व भागात बनावट सिमेंट बनवून नामांकित सिमेंट कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्कृष्ट दर्जाचे सिमेंट नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता. काही जागरूक नागरिक पोलिसांना या काळ्या उद्योगाची माहिती देत बनावट सिमेंट बनविणाऱ्यांचे पितळ उघडले पाडले आहे.

बनावट वस्तू तयार करून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी खाद्य पदार्थांचे देखील बनावट पदार्थ तयार करून ते नामांकित कंपनीच्या पॅकिंगमध्ये भरून विक्री केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. आता अशाच प्रकारे बनावट सिमेंट तयार करण्याचा प्रकार कल्याण पूर्वमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे या निष्कृष्ट दर्जाच्या सिमेंटला चाळण मारून पुन्हा सीलबंद करण्याचा उद्योग याठिकाणी सुरू होता.

लाखो रुपयांचे सिमेंट जप्त 

सदरची जागा हि नरेश मिश्र आणि ही कंपनी उल्हासनगरमधील नवीन भाटिया नामक व्यक्तीची असल्याची माहिती तेथे काम करत असलेल्या कामगारानी दिली आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून चार ट्रकसह लाखो रुपयांचे निकृष्ट सिमेंट जप्त केले आहे. पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ

घर किंवा मोठ्या इमारती उभारताना नामांकित कंपनीच्या सिमेंटचा वापर केला जात असतो. अर्थात घराचे बांधकाम वर्षानुवर्षे चांगले मजबूत राहू शकेल. मात्र या बनावट सिमेंटमुळे बांधलेल्या इमारती कधीही कोसळू शकतात आणि जीवित हानी होण्याची मोठी शक्यता आहे. एक प्रकारे नागरिकांच्या जीवावरचे एक संकटच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT