Pandharpur : अखेर निराधार वृध्द महिलेला मिळालं हक्काचं घर; घर उभारण्यासाठी नृत्यांगना सायली पाटील यांच्या पुढाकार

Pandharpur News : नव्या घराच्या निमित्ताने आजीच्या जीवनात नवी प्रकाश किरणेही सोबत आली आहेत. चैतन्य, उत्साहाचा आणि नाविन्याचा सोनेरी प्रकाश घेवून येणारी यंदाची ही दिवाळी अनुसाया आजीला जगण्यासाठी बळ देणारी नवी भेट ठरली आहे
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : साहेब...तुम्हीच माझे माय बाप आहात. मला कोणी तरी मदत करा हो...अशी आर्त हाक पंढरपूर जवळच्या धोंडेवाडी गावातील अनुसया जाधव या 80 वर्षांच्या वयोवृध्द अपंग महिलेने दिली होती. तिची आर्त हाक समाज माध्यमातून नृत्यांगना सायली पाटील यांच्यापर्यंत पोचली. सायली पाटील यांनी गाव गाठून वृद्ध महिलेसाठी दोन दिवसात पक्क घर उभा करून दिल्याने या वृद्धेला हक्काचे घर मिळाले आहे. 

पंढरपूर जवळील धोंडेवाडी येथील अनुसया जाधव ह्या मागील २० वर्षापासून धोंडेवाडी येथे एका जुन्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात राहत होत्या. त्यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्या सध्या घरातच अंथरुणावर पडून असतात. निराधार असल्याने त्यांच्या दररोजच्या अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहते पत्र्याचे घरही मोडकीळस आले. पाऊस आला की घरात पाणी येते. वीज ही नाही. त्यामुळे ही वृध्द महिला अंधाऱ्या खोलीत जीवन कंठत होती. तरीही तिची जगण्यासाठीची धडपड आणि संघर्ष सुरुच होता. 

Pandharpur News
Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

आजीकडे मुक्कामी राहत उभारले घर 

याच दरम्यान तीने मदतीसाठी माय बाप सरकारकडे दयेची याचना केली. पण तिच्याकडे कोणी आमदार, खासदार फिरकला नाही की कोणी अधिकारी. पण संवेदनशील मनाच्या सायली पाटील या वृध्द आजीची हाक पोचली. यानंतर सायली पाटील या वृध्द महिलेच्या मदतीसाठी लेकीच्या नात्याने धावून आल्या. एक दिवस मुक्काम करुन त्यांनी घरासाठी लागणारे सर्व साहित्य जमा करून नवीन नवं घर उभ केले. गावकर्यांनी ही तिच्या नव्या घरात वीचेजी सोय केली. मोडक्या तोडक्या अंधाऱ्या खोलीत राहिणाऱ्या अनुसया आजीला आता नवं घर मिळालं आहे.  

Pandharpur News
JDCC Bank : जिल्हा बँकेच्या 'दगडी इमारत' विक्रीवरून राजकारण तापले; महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

नव्या घरात प्रवेश 

काल नव्या घरात वृध्द आजीचा गृह प्रवेशही मोठ्या उत्साहामध्ये झाला. पहिल्यांदाच घराला फुलांचा हार लागल्याचे पाहून आजीच्या चोहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. एका निराधार महिलेची करुण कहाणी समजल्यानंतर माणूसकीच्या नात्याने धावून आलेल्या सायली पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पांडुंरंगाच्या कृपेने मला मला एक आजी मिळाल्याची भावना सायली पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com