JDCC Bank : जिल्हा बँकेच्या 'दगडी इमारत' विक्रीवरून राजकारण तापले; महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

Jalgaon News : शरद पवार गटाचे एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील विक्रीला विरोध करत असताना अजित पवार गटाचे अनिल पाटील, सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर संजय पवार यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यामुळे इमारत विक्रीवरून महायुतीतील फूट
JDCC Bank
JDCC BankSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक असलेली दगडी बँक इमारत विक्रीस काढण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहण्यास मिळत आहे. बँकेचे चेअरमन संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात या मुद्यावरून थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इतकेच नाही तर याच मुद्यावरून महायुतीत देखील फाटाफूट झाल्याचे चित्र आहे. 

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठ परिसरातील असलेली पुरातन इमारत जी दगडी बँक म्हणून ओळखली जाते. हि बँकेची इमारत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण शतकोत्तर परंपरा असलेली ही इमारत विक्री करण्याचा घाट बँकेच्या संचालक मंडळाने घातला आहे. याला बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र विरोध केला असून यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. 

JDCC Bank
Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

खडसेंच्या आरोपावर बँक अध्यक्षांचा पलटवार 

एकनाथ खडसे यांनी बँक इमारत विक्रीला कडाडून विरोध करत इमारतीसोबत शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या असल्याचे नमूद करत संजय पवार यांना पत्र लिहिले. त्यांनी ६२ कोटींची जागा कमी किमतीत विकण्याचा आरोपही केला. त्यावर संजय पवार यांनी प्रत्युत्तर देताना, खडसे यांच्या कार्यकाळातही मालमत्ता विकल्या गेल्याचे दाखवत पलटवार केला आहे.

JDCC Bank
Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

महायुतीत फूट 
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवत ६२ कोटींची मालमत्ता २२ कोटींना विकून कुणाचं भलं होतं? असा सवाल उपस्थित केला. तर संचालक मंडळाने विक्रीचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करतील; असा इशारा देखील केला आहे. त्यावर संजय पवार यांनी प्रत्युत्तर देत, चांगलं गिर्‍हाईक आणा, आम्ही त्याला चांगल्या किमतीत विकू असा टोला लगावला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीमध्ये फूट पडलेली स्पष्ट होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com