Buldhana : महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणूक; सीड्स उत्पादन करणेसाठी दिलेले बियाणे निघाले दुसऱ्या जातीचे

Buldhana News : शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यासंदर्भात शेतकऱ्यांनी महाबीज, कृषी विभागसह इतर ठिकाणे तक्रारी केल्या असून तत्काळ न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : बियाणे खरेदी करताना अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला असून महाबीजकडूनच हि फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कारण सीड्स उत्पादन करण्यासाठी दिलेले बियाणे दुसऱ्याच जातीचे निघाले आहे. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

बुलढाणा जिल्ह्याच्या वर्दाडा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी आपल्या दहा एकर शेतात महाबीज कडून बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत MAUS - 725 या जातीच्या सोयाबीन बियाण्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी महाबीजकडे कागदपत्रांची पूर्तता करत १० बॅग सोयाबीन बियाणे सुद्धा विकत घेतले होते. ते सोयाबीन बियाणे पेरून साडे तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला; तरीही महाबीज कडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी सीड प्लॉट पाहण्यासाठी आला नव्हता.

Buldhana News
JDCC Bank : जिल्हा बँकेच्या 'दगडी इमारत' विक्रीवरून राजकारण तापले; महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

सीड प्लॉट रिजेक्ट झाल्याचे कारण 

दरम्यान सोयाबीन बियाणे काढण्यावर आले असता महाबीज म्हणते की तुमचा सीड प्लॉट रिजेक्ट झाला असून आम्ही ते सोयाबीन बियाणे घेऊ शकत नाही. कारण आम्ही ज्या MAUS 725 जातीचे सोयाबीन बियाणे दिले होते. ते शेतात नसून दुसऱ्याच जातीचे सोयाबीनचे वाण आहे. अर्थात बियाणे लागवडीपासून आता काढणीपर्यंत शेतकऱ्याने पिकाची निगा राखलं उत्पादन घेतले आहे. 

Buldhana News
Pandharpur : अखेर निराधार वृध्द महिलेला मिळालं हक्काचं घर; घर उभारण्यासाठी नृत्यांगना सायली पाटील यांच्या पुढाकार

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान 

त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यासंदर्भात शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी महाबीज, कृषी विभागसह इतर ठिकाणे तक्रारी केल्या असून तत्काळ न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यासंदर्भात महाबीज अधिकारी यांना विचारणा केली असता अधिकारी म्हणतात की कृषी विभागाचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल आणि अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com