Kalyan Dombivali E Bus Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Dombivali E- Bus : कल्याण, डोंबिवली, बदलापुरात पुढच्या दहा दिवसात ई- बस धावणार; पुणे, पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर परिवहन योजना

Kalyan News : भिवंडी, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर भिवंडी, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद (Kalyan) अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. (KDMC) शासनाची अंतिम मंजुरी लवकर मिळेल. मुख्य म्हणजे पुढच्या दहा दिवसात कल्याण व डोंबिवलीत ५ इ बस धावणार; असे केडीएमसीच्या आयुक्त इंदुरानी जाखड यांनी सांगितले. (Latest Marathi News)

एकात्मिक परिवहन योजनेमुळे या शहरातील सार्वजनिक वाहतूक चांगली होणार आहे. याचा फायदा (Dombivali) शहरातील नागरिकांना मिळणार आहे. हा प्रस्ताव सामन्यांसाठी फायदेशीर असून दरात देखील नक्कीच फरक पडेल. पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या धर्तीवर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. याचा आर्थिक भार देखील पाचही नगरपालिकेवर पडणार आहे. परंतु शहरातील नागरिकांसाठी ही सेवा फायद्याची ठरणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकूण ५०७ ई बसेस येणार 

प्रत्येक पालिकेला तीन महापालिकांना १०० ई बसेस देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीच्या २०७ ई बसेस अशा एकूण ५०७ ई बसेसचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुढील दहा दिवसात पाच ई बसेस धावतील. तसेच चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त इंदुरानी जाखड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT