Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यावर सोशल मीडियावर अश्लील कमेंट; संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: भाजपच्या सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर संशयित आरोपीला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुशील पाटेकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तो भाजपच्या सोशल मीडियाच्या टीममध्ये कार्यरत होता. काही महिन्यापूर्वी त्याने भाजप सोडल्याची माहिती आहे.

कल्याण (Kalyan) पूर्वेतील भाजपच्या सोशल मीडिया टीमचे सदर पीडित महिला काम पाहते. या महिलेला सुशील पाटेकर नावाचा व्यक्ती सातत्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकतो, धमकी देत असून हा प्रकार काही दिवसांपासून सुरू झाला होता. इतरही महिला पदाधिकाऱ्यांना हा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत त्यांच्याविषयी अश्लील धमकी देत होता. याबाबत कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार देण्यात आली होती. कोलशेवाडी पोलिसांनी (Police) सुशील विरोधात गुन्हा दखल केला होता. 

दरम्यान या प्रकरणाचा तपास करत रविवारी सकाळी सुशीलने पुन्हा महिलेबाबत घाणेरडे कमेंट टाकले. अखेर या पीडित महिलेसह इतर पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी सुशील विरोधात आज सुद्धा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने आधी हा प्रकार केल्यानंतर सुशील पाटेकर याला पोलिसांकडून आणि आमच्याकडून समज देण्यात आली. मात्र परत त्याने तोच प्रकार सुरू केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: मुंबईत HFMD विषाणूचा संसर्ग; वेदनादायी अल्सरचा मुलांना धोका

Maharashtra News Live Updates: आमदार शहाजी‌बापूंच्या मदतीसाठी भाजपचे दोन हजार कार्यकर्ते मैदानात

Pune Metro : मध्यरात्री मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुलगी झाली हो! 'Bigg Boss' फेम कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, पाहा PHOTO

Santosh Bangar News: आचारसंहितेचा पहिला दणका! 'फोन पे' प्रकरण अंगलट आलं, शिंदेसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT