Dengue  Saam tv
महाराष्ट्र

Dengue : कल्याण डोंबिवलीत डेंगू, मलेरियाचा डंख; डेंगूचे ३५ तर मलेरियाच्या ६० रुग्णांची नोंद

Kalyan Dombivali News : मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि मॉन्सूनचा पाऊस यामुळे कल्याण डोंबिवलीत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यानुसार कल्याण- डोंबिवलीत डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून आले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली परिसरात डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. मेपासून आतापर्यंत डेंगूचे तब्बल ३५ रुग्ण आढळून आले आहेत. तर फक्त जून महिन्यात ४१ आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात १८ मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे केडीएमसीचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून ठिकठिकाणी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. 

पावसाळा सुरु झाला कि साथरोगांचा फैलाव होण्यास सुरवात होत असते. प्रामुख्याने डासांची उत्पत्ती झाल्यानंतर डेंगू आणि मलेरिया यासारखे साथरोग पसरत असतात. त्यानुसार मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मॉन्सूनचा पाऊस यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यानुसार कल्याण- डोंबिवलीत डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.  

संशयित रुग्णांचे सॅम्पल टेस्ट 

केडीएमसीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यापासून आतापर्यंत डेंगूचे ३५ रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचे रुग्णही वाढले असून जूनमध्ये ४१ तर जुलै महिन्यात आतापर्यंत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक संशयित रुग्णाचा सॅम्पल घेऊन ठाण्यात एलायझा टेस्ट केली जाते. खाजगी हॉस्पिटल्स, लॅब आणि डॉक्टरांकडून दररोजचा डाटा संकलित केला जातो. 

आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण सुरु 

दरम्यान केडीएमसीकडून गृह निर्माण सोसायट्यांच्या अध्यक्षांचा एक विशेष ग्रुप तयार करण्यात आला आहे. नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर या अध्यक्षांच्या सतत संपर्कात राहून संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ त्या परिसरात तपासणी, सर्वेक्षण व फवारणी केली जात आहे. तसेच डेंगूच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढत असल्यामुळे एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन देखील आता पालिकेकडून केले जातं आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT