Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, रेल्वे पोलिसांनी विकृताच्या मुसक्या आवळल्या

Crime News Kalyan: कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाला संशय आला. पोलिसांनी अरुणसह दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण रेल्वे स्टेशन आणत एका विकृताकडून दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. मंगल अनेक महिन्यांपासून हा अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अरुण उत्तप्पा असे या विकृटाचे नाव आहे. तर पीडित दोन्ही अल्पवयीन मुले हे वडाळा येथे राहणारे होते. अरुण त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्याने दोन्ही मुलांना कल्याण मध्ये आणले होते. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाला तिघांना पाहून संशय आला. पोलिसांनी अरुणसह दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांचे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

मुलांना फिरण्याच्या निमित्ताने आणले बाहेर 

रविवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात फलाटावर फिरत असलेल्या तीन संशयितांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. यातील दोन लहान मुले ११ वर्षाची असून आरोपी अरुण २८ वर्षाचा आहे. चौकशीत अरुण याने परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना फिरण्याच्या निमित्ताने बाहेर आणले होते. यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे मुलांनी सांगितले. 

लिपस्टिक व जेलचा वापर करून अत्याचार 

सदर मुलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अरुण हा मुलांना लिपस्टिक लावून तसेच जेलचा वापर करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तर कल्याण स्थानकातून पुढे जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांवर पोलिसांना संशय आल्याने या चिमुकल्यांची अत्याचारातून सुटका झाली आहे. दरम्यान हे तिघेही मुंबईतील वडाळा परिसरात राहत असल्याने पोलिसांनी हा गुन्हा वडाळा पोलिसाकडे वर्ग केल्याचे कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

Hair Wash Tips: पावसाळ्यात किती वेळा केस धुवावे?

Koradi Temple Gate: नागपुरातील मंदिराचा गेट कोसळला,अनेकजण दबल्याची माहिती

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना १,५०० ऐवजी २,१०० मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना धक्का; कल्याणमधील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT