नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आज वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना काही गावगुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता त्या गावगुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीच्या बातमीचे वार्ताकनासाठी जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली होती.
यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात सर्व पत्रकरांची भेट घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना फोन करून गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या गुंडांना गजाआड करत पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी प्रशांत राजू सोनवणे (21), शिवराज धनराज आहेर (21), ऋषिकेश योगेश गांगुर्डे (19) आणि त्यांच्या टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
मारहाणीच्या दरम्यान घटनास्थळी नेमके काय घडले?
साम टीव्हीचे प्रतिनिधि अभिजीत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्यांच्याकडून प्रवेश कर वसूल केला जातो. यासाठी काही गावगुंड इथे तैनात केली जातात आणि या मुलांनीच त्यांच्यासह तिथे असणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली. यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या किरण ताजणे यांना बेदम मारहाण करण्यात आली
पत्रकार म्हणून साधूमहंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याच बैठकीचे वार्ताकन करण्यासाठी पत्रकार त्र्यंबकेश्वरला गेले असता वाटेत करवसूली करणाऱ्या या मुलांनी पत्रकारांना अडवलं. त्यांना पत्रकार असे सांगून देखील जाऊ दिले नाही. गाड्या बाहेरच ठेवण्यास सांगितले. बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न करूनही त्या मुलांनी उद्धट बोलणे सुरू ठेवले. शेवटी पत्रकारांनी त्यांच्या ठेकेदाराशी फोनवरून संवाद साधत त्यांना सर्व समजावून सांगितले. मात्र कुठल्याही परिस्थितीत जाऊ दिले जाणार आहे असे उत्तर मिळाले आणि त्यानंतर शाब्दिक वाद झाला आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.