Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरण ९९ टक्के भरली आहेत. धरण क्षेत्रात गेल्या अडीच महिन्यात चांगला पाऊस झाला.
Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली
Mumbai Dam Water LevelSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईला पाणीपुरवठा करणारी ७ धरणं भरली आहेत.

  • सातही धरणांमध्ये ९९.७० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे

  • मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे

फैयाज शेख, शहापूर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणं ९९ टक्के भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये धरणक्षेत्रामध्ये तुफान पाऊस झाला. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. सध्या राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात ही धरणे ९९.७० टक्के भरली आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. दर दिवस मुंबईकरांना ४१०० मिलियन लिटर पाण्याची पुरवठा केला जातो. मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रतिदिवस ४६०० मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीने गारगाई प्रकल्प धरण राबविण्यात येत आहे.

Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली
Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या प्रकल्पात ३ लाख झाडे बुडीत क्षेत्रात जात असून सहा गावे बाधीत होत आहे. या सहाही गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या सहा गावांपैकी दोन गावे धरणात बुडत असून चार गावांच्या जमीनीवर ३५० हेक्टर जमिनीवर धरण क्षेत्रात बुडीत ३ लाख झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जेणे करून मुंबईकरणांच्या पाण्याची चिंता मिटेल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल.

Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली
Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामधील ५ धरणं आहेत आणि २ तलाव आहेत. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या अडीच महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा आता ९९.७० टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा आणखी वाढत चालला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

Mumbai Dam Water Level: आनंदाची बातमी! मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ९९ टक्के भरली, वर्षभराची चिंता मिटली
Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com