Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Maharashtra News : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रे तुडुंब भरली असून अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीची लक्षणीय वाढ पाहता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Maharashtra newsSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणक्षेत्रे तुडुंब भरली.

  • पुणे जिल्ह्यातील चार धरणे ९०% पर्यंत भरल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटला.

  • राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

  • हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, इसापूर व सिद्धेश्वर धरणे पूर्ण क्षमतेने भरली; पुढील वर्षभरासाठी पुरेसा पाणी साठा.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रे तुडुंब भरली असून पुणे, वाशीम, कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, धाराशी जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही भागांत शेती पाण्याखाली गेल्याने नुकसानही झाले आहे. मात्र, एकंदरीत पाहता पाण्याची टंचाई मिटल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे धरण साठा

पुणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचे महत्त्वाचे स्रोत असलेली खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे तब्बल ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यापैकी खडकवासला धरणात ५३.१२ टक्के तर पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच निरा देवघर धरण ९८.२८ टक्के भरले असून धरणामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. त्यामुळे सकाळी ८.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्याद्वारे तब्बल ६,८८० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Pune Dam Water Levels : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! खडकवासला ते टेमघर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात आणखी बदल होऊ शकतो असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी आधी झालेल्या पावसामुळे जलसाठ्याची पातळी समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात या वेळेस सुमारे सात टक्के कमी पाणी साठा असल्याचे दिसून येत आहे,

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

धाराशिव धरण साठा

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने तेर, ढोकीसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Dharashiv Crime : जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवलं; आधी गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार, परिसरात खळबळ

वाशिम धरण साठा

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कुकसा प्रकल्पही तुडुंब भरून वाहत आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटल्या आहेत. मात्र, प्रशासनाने नागरिकांना धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

अमरावती धरण साठा

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात पाणीसाठ्यात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या या धरणात ६५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या धरणांमध्येही ६६ टक्के जलसाठा झालेला आहे. तरीही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जलसाठा कमी असल्याने पाणी नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Amravati Tourism: माथेरान, खंडाळा विसराल...! आपल्या अमरावतीमधील 'या' ठिकाणचं सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

हिंगोली धरण साठा

हिंगोली जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प येलदरी, इसापूर आणि सिद्धेश्वर हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पुढील वर्षभरासाठी हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Hingoli Flood: नांदेडमध्ये पूराचं संकट कायम, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरलं; बळीराजा चिंतेत

कोल्हापूर धरण साठा

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या ७,२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला
Kolhapur Rain | Radhanagari Dam मधील पाणीपातळीसोबत ठाकरेंच्या बर्थडेवर काय म्हणाले दीपक केसरकर?

यंदाच्या पावसाने धरणक्षेत्र भरून वाहायला सुरुवात केली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात दूर होईल, मात्र अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसानही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची ही ‘बॅटिंग’ आनंदासोबतच थोडी चिंता देखील निर्माण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com