Jitendra Awad Apologized saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad: अनवधानाने माझ्याकडून मोठी चूक झाली, जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

Jitendra Awad Apologized: महाड येथे मनुस्मृतीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या अंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेमुळे आता राजकारण तापले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Priya More

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध करत आज आंदोलन केले. मनुस्मृतीचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत महाड येथे आंदोलन केले. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन त्यांनी पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचे दहन करत विरोध व्यक्त केला. यावेळी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो फाडत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील फाडले गेले. यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी करत काही राजकीय नेत्यांनी त्यांना अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या माध्यमातून त्यांनी माझ्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधाने फाडला गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी या व्हिडीओद्वारे सर्व आंबेडकर प्रेमींची माफी मागितली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली.'

जितेंद्र आव्हाड यांनी पुढे असे म्हटले आहे की,'मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो. गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे. डॉ. बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे.'

तसंच, 'मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही. मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील. हा विश्वास आहे.', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर त्यांच्याविरोधात महाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याविरोधात महाड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT