Jitendra Awhad Apology Saam TV
महाराष्ट्र

Jitendra Awhad Apology: मी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागतो पण...; श्री राम यांच्यावरील वक्तव्याचा आव्हाडांनी पुरावाच दिला

Jitendra Awhad Controversial Statement: माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, हा वाद मला वाढवायचा नाही. पण, वाल्मिकी रामायनात ६ कंद आहेत. यातील आयोध्या कंदातील सर्ग ५२ आणि श्लोक १०२ आहे.

Ruchika Jadhav

NCP Mla Jitendra Awhad:

आयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशात राज्याच्या राजकारणात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने चांगलाच वाद पेटलाय. प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांवर विरोधकांकडून टीकेचे बाण सोडण्यात आलेत. या सर्वांवर आता जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. पण काल मी जे काही बोललो ते ओघात बोललो. प्रभू श्री रामांना आम्ही महाराष्ट्रात रामकृष्णहरी म्हणतो. रामच आमचे पाडुरंग आहेत. त्यांच्याबाबत बोलताना राम मांसाहारी होते असं मी काल म्हटलं. हा वाद मला आता वाढवायचा नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, हा वाद मला वाढवायचा नाही. पण, वाल्मिकी रामायनात ६ कंद आहेत. यातील आयोध्या कंदातील सर्ग ५२ आणि श्लोक १०२ आहे. त्यामुळे वाल्मिकी रामायनात लिहिलेल्या गोष्टींवर कुणाचा अक्षेप असेल तर सांगावं. अन्न पुराणी नावाचा एक चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणेतील दोन्ही सुपरस्टार यात काम करत आहेत. यातही त्यांनी याबाबत वक्तव्य केलंय, असे पुरावे आव्हाडांनी आपल्या वक्तव्याबाबत दिले आहेत.

अभ्यासाशिवाय मी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र त्याहीपुढे जाऊन सांगायचं झालं तर सध्या अभ्यासापेक्षा भावनांना जास्त महत्व आहे. त्यामुळे माझ्या कालच्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी खेद व्यक्त करतो, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड सध्या शिर्डीतील सन अँन्ड सॅण्ड हाॅटेलमधून थोड्याच वेळात अधिवेशनस्थळी पोहचणार आहेत. प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आलाय.

काय म्हणाले होते आव्हाड

"राम शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते. १४ वर्ष वनवासात राहणारे राम शाकाहारी कसे असतील? असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का? प्रभू राम यांच्याकाळात तांदूळ अस्तित्वात नव्हता. मग ते तेव्हा काय खात होते. त्यात राम हे क्षत्रिय होते आणि क्षत्रियांचे जेवण हे मांसाहारी असते.", असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT