MIRAJ JIO TOWER THEFT CASE: ₹19.6 LAKH EQUIPMENT STOLEN IN SANGLI Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत कधी काय होईल नेम नाय! चक्क मोबाइल टॉवर गेला चोरीला, चोरट्यांनी नेमकी संधी साधली कशी?

Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे जिओ कंपनीचा १९.६० लाख रुपये किमतीचा टॉवर सेट अज्ञात चोरट्यांनी चोरी केला. मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Alisha Khedekar

  • मिरज तालुक्यातील आरग येथे जिओ टॉवर सेट चोरी

  • चोरीची एकूण किंमत १९.६० लाख रुपये

  • ६ ते ११ मेदरम्यान घटना घडल्याचा अंदाज

  • मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

  • नियोजनबद्ध टोळीचा संशय, CCTV तपास सुरू

विजय पाटील, सांगली

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. आरग परिसरातील जिओ कंपनीचा तब्बल १९ लाख ६० हजार रुपये किमतीचा टॉवर सेट अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरग येथील शेतकरी देवदास माने यांच्या शेतजमिनीत रस्त्यालगत जिओ कंपनीचा टॉवर सेट उभारण्यात आला होता. ६ मे ते ११ मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हा टॉवर सेट पूर्णपणे उचलून नेल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि वजनदार साहित्य चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमागे नियोजनबद्ध टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या चोरीबाबत विशाल प्रभाकर चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १९ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. टॉवर सेटसारखे मोठे आणि महागडे उपकरण चोरीला गेल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या चोरीसाठी मोठ्या वाहनाचा वापर झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, त्या अनुषंगाने परिसरातील वाहनांची हालचालही तपासली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

SCROLL FOR NEXT