नांदेड : ''सत्ता मिळाल्याशिवाय महाराष्ट्राच्या हिताचे काम करणार नाही, अशी विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. अशी घणाघाती टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी केली आहे. ते नांदेड (Nanded) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री जयंत पाटील नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरून विरोधी पक्षावर टीका केली केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे.
यावेळी आम्हाला सत्ता मिळाल्यावर ४ महिन्यांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून दाखवतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. या आव्हानाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी फडवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. जनतेने तुम्हाला नाकारले आहे. भाजपामध्ये ओबीसी नेतृत्व संपवण्याचा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहात ते आम्हाला सांगा. आम्हीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
सत्तेत आल्याशिवाय ओबीसींसाठी काहीच काम करणार नाही, ही भावना खऱ्या लोकप्रतिनीधींची नाही. तुम्हाला ओबीसींचा इतका कळवला असेल तर मग छगन भुजबळांना तुरुंगात खितपत का ठेवले, एकनाथ खडसे यांच्यासारख्या ओबीसी समाजातील नेत्यांना पक्षाबाहेर पडण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली, असा सवलाही यावेळी जयंत पाटील यांनी केला. याशिवाय भाजपत ओबीसी नेता राहणार नाही, बीसीची चळवळ मारण्याची काम भाजपने केले, आणि आता ओबीसीच्या आरक्षणासाथी आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे, असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
त्याचबरोबर, आरबीआयने सहकारी बँकात राजकीय मंडळीना संचालक होता येणार नाही असे निर्देश दिले. या मुद्यावर जयंत पाटील यांनी भाजपवर टिका करताना सहकारी बँकांवर अशी बंधन घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.