डेक्कन एक्सप्रेसचा व्हिस्टाडोम कोच वाढवतोय रेल्वेची शान

प्रवाशांच्या आवडती असणारी डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा धावू लागली आहे
डेक्कन एक्स्प्रेसमध्ये नवा व्हिस्टाडोम कोच
डेक्कन एक्स्प्रेसमध्ये नवा व्हिस्टाडोम कोच- Sagar Awhad
Published On

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे काही काळ रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव जस जसा कमी होऊ लागला तस तसा रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू होण्यास मदत झाली. त्यातच प्रवाशांच्या आवडती असणारी डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा धावू लागली आहे.

या दीड वर्षांच्या कालावधीने डेक्कन एक्सप्रेसचा व्हिस्टाडोम कोच वाढवण्यात आला आहे. त्यामध्ये बसल्या जागी 360 डिग्री फिरल्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता, अशी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रेल्वेत बसवण्यात आलेले काचेचे स्पेशल व्हिस्टाडोम कोच प्रवाशांचा आनंद वाढवत आहेत. शिवाय सर्वच्या सर्व बुकही झाले आहेत.

हे देखिल पहा

त्यामुळे रेल्वेचा डेक्कन एक्सप्रेसचा प्रवास हा निर्सगाची विविध रूपे पाहण्यासाठी स्पेशल ठरणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केले की, “मुंबई-पुणे मार्गावर, स्पेशल डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेले व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढवत आहेत. यामध्ये प्रवास करणारे त्यांचे अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे,''

Edited By - Amit Golwalkar

डेक्कन एक्स्प्रेसमध्ये नवा व्हिस्टाडोम कोच
Breaking ईगतपुरीच्या रेव्ह पार्टीत पोलिसांना आढळले कोकेन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com