Jayant Patil Saam Digital
महाराष्ट्र

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही पुतळा उंच होऊ नये, असं त्यांनी ठरलं असेल, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी आज केला.

Sandeep Gawade

अरबी समुद्रातील स्मारक समितीचा अध्यक्ष असताना सर्व व्यवस्था केल्या होत्या, पण नवीन सरकार आलं. त्या सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही पुतळा उंच होऊ नये, असं ठरलं असेल आणि म्हणून त्यांनी आकाराने लहान कमी असा पुतळा उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे.

संभाजी राजे जे म्हणतात ते योग्य आहे. इतकी वर्ष होऊनही त्यांना योग्य तो पुतळा उभा करता आला नाही. सिंधुदुर्गात जो पुतळा उभा केला तोही पडला. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे स्पष्ट असल्याचंही पाटील म्हणाले. संभाजी राजे यांनी आज अरबी समुद्रात जाऊन ज्या ठिकाणी शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र स्मारक कुठेही दिसलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून राजकीय वादंग उठलं असताना जयंत पाटील यांनीही सरकारवर आरोप केले आहेत.

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं भूमीपूजन झालं होतं. स्मारकाचं जलपूजन करताना मनात शंका होती, पण चांगलं काम होत होतं त्यामुळे काही बोललो नाही. पण आता या घटनेला ८ वर्ष झाली आहेत. आज स्मारक शोधण्यासाठी अरबी समुद्रात गेलो होतो, मात्र शिवाजी महाराजांचं स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव वापरून केवळ राजकारण केलं जातं, मात्र यावेळी ते होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी राजे यांनी आज मुंबईत दिला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

तारा भवाळकर नेहमी योग्य बाजू मांडली

तारा भवाळकर यांना गेले 40 वर्षे आम्ही फार जवळून ओळखतो. त्यांचं विशेष योगदान साहित्यामध्ये आहे आणि त्यांनी नेहमी योग्य आणि खरी बाजू घेण्याचे काम आयुष्यभर केले. आम्हाला आनंद आहे आणि त्यांच्या निवडीचं स्वागत करतो. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष त्या आहेत. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे पहिलं संमेलन होते याचा आम्हाला अभिमान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT