Arabian Sea Shiv Smarak : 8 वर्ष झाली, स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही; अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : PM मोदींच्या हस्ते 2016 मध्येशिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं भूमीपूजन केलं होतं, मात्र आता ते दुर्बिणीतूनही दिसत नसल्याचं संभाजी राजे यांनी सांगितलं.
Arabian Sea Shiv Smarak
Arabian Sea Shiv SmarakSaam Digital
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं भूमीपूजन केलं होतं. जलपूजन करताना मनात शंका होती, पण चांगलं काम होत होतं त्यामुळे काही बोललो नाही. पण आता या घटनेला ८ वर्ष उलटून गेली आहेत, शिवरायांचं स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही. शिवाजी महाराजांचं नाव वापरून राजकारण केलं जातं, मात्र यावेळी ते होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी राजे यांनी आज मुंबईत दिला.

दुर्बिणीतून मी स्मारक पाहात होतो, पण ते दिसत नव्हतं. बोट वाल्यांना विचारलं जाऊ शकतो का, पण त्यांनी परवानगी नसल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई मध्ये व्हावं छत्रपती शाहू महाराजांनी ही इच्छा व्यक्त केली होती.स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांनी इथे स्मारक व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली ती कौतुकास्पद आहे. गडकोट किल्ल्यांवर कोणी बोलत न्हवतं.पण निवडणुकीला फक्त शिवाजी महाराजांचा नाव वापरून मत मागायची हे मी होऊ देणार नाही.

स्मारक कुठेही पाहायला मिळत न्हवतं. जलपूजन करताना मनात शंका आलेली पण चांगलं काम होत असताना काही बोललो नाही. Dcp मधून स्मारक आणि गडकोट किल्ल्यांसाठी किती पैसे खर्च केले? हा प्रश्न आहे. महाराजांचं नाव राजकारणात चांगल्यासाठी वापरा, खेळ करू नका, 8 वर्षे झाली. देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा परवानगी हवी, मात्र परवानगी नसताना पंतप्रधानांना बोलावले कसं?. दरवर्षी महाराजांचं नाव राजकारणात वापरलं जातं. या निवडणूकत मात्र ते होऊ देणार नाही.

Arabian Sea Shiv Smarak
Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

मी व्यक्तिगत कोणाच्या विरोधात बोलत नाही. सुशीलकुमार यांच्या पासून सुरुवात केली तर आताच्या एकनाथ शिंदे पर्यंत सर्वाचं ते कर्तव्य होतं. देवेंद्र फडणवीस यांना माझी सूचना आहे. जे काही चुकलं ते चुकलं पण गडकिल्ल्याना पैसे द्या. मुंबई मनपा निवडणूक असताना ते लक्षात ठेवून या स्मारकाची घोषणा केली. आता पर्यावरण लोकांनी विरोध केला आता तक्रार करून चालत नाही. तुम्ही थेट पंतप्रधानांना बोलावून जलपूजन करतात हे पूर्णपणे जनतेला फसवण्याचे काम केलं आहे.

Arabian Sea Shiv Smarak
Bihar News : अंघोळीसाठी गेलेली ७ मुलं नदीत बुडाली; संपूर्ण गावावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com