आजपर्यंत कोणत्याही सरकारने न दिलेल्या योजना महिलांना यावेळेच्या अर्थसंकल्पात दिल्या आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय योजना माझी लाडकी बहिण योजना आहे. या आठवड्यातच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले जातील, येत्या ८-१० दिवसात भाऊबीजेची ओवाळणी मिळेल पण आम्हाला कधीच विसरू नका, असं आवाहन अजित पवार यांनी आज महिलांना केलं.
विरोधक टीका करतात ही योजना बंद पडेल. मात्र आर्थिक बाबतीत आपलं राज्य सक्षम आहे, प्रगतीशिल आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही, सर्व योजना योग्यरितीने सुरू राहतील. या सर्व योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मात्र लाडक्या बहिणींनी एक करावं लागेल.येणाऱ्या निवडणुकीत जे महायुतीचे उमेदवार असेल त्यांना मतदान करावे लागेल. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करतो. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर काम करत नाही. त्यामुळे येत्या ८-१० दिवसात भाऊबीजेची ओवाळणी मिळेल पण आम्हाला कधीच विसरू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
यापुढे शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीजबिल भरावं लागणार नाही, शेतकऱ्यांना सककार शून्य बिल देत आहे. अडीच लाख तीन लाख रुपयाचा सौऊर्जेवरचा पंप सरकार देत आहे. योजना आणल्यावर विरोधक टीका करायचे योजना सुरू होणार नाही म्हणायचे पण आता योजना सुरू झाली पैसेही मिळाले. तुमच्या खात्यात मिळाल्या पैसे मिळाल्यावर आम्हाला आनंद होतोय पण तुमच्या सावत्र भावाला आनंद होत नाही तुमचे काही भाऊ हायकोर्टात गेले. अकाँग्रेसचे अनिल वडपल्लीकर हे कोर्टात गेले,पण योजना बंद करण्याचे त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
लाडकी बहीण योजनेत सावत्र भावांनी खोडा घातला होता. दुष्ट भावाला योग्य वेळी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे. ही योजना कोणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही. पैसे ऍडव्हान्स देणारे आहे. आचारसंहिता लागली की हे सावत्र भाऊ कुठेतरी मांजर आडवा घालतील. त्यामुळे दिवाळीपूर्वी दोन महिन्याचे पैसे दिले आहेत. आमचे नियती साफ आहे. देण्याची प्रामाणिक इच्छा आहे.तुम्ही आमची ताकत वाढवा, दीड हजाराचे दोन करणार, दोन हजाराच्या अडीच हजार करणार अडीच हजार ते तीन हजार करणार. तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचे पाहायचे आहे. ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.