jay chaudhary, Chandrapur
jay chaudhary, Chandrapur saam tv
महाराष्ट्र

Success Story : ट्रकचालकाच्या मुलाची लंडनपर्यंत मजल, वाचा जय चाैधरीच्या जिद्दीची कहाणी

संजय तुमराम

Chandrapur News : घरची परिस्थिती प्रतिकूल, शिक्षणासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसताना देखील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील जय भारत चौधरी याने माेठे यश प्राप्त केले आहे. जय चाैधरी (jay chaudhary) याची एडिनबर्ग विद्यापीठ स्कॉटलंड येथे "सामाजिक शिक्षण तसेच डेटा असमानता आणि समाज' या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी निवड झाली आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या बल्लारपूर शहरातील बुद्धनगर दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या जयने मोठी झेप घेतली आहे. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्याने जिल्हाचे नाव मोठं केले.

जयचे दहावीपर्यंत शिक्षण बल्लारपुरातील सर्वोदय विद्यालय या मराठी माध्यमाचा शाळेत पूर्ण झाले. बारावी हैदराबाद येथून तर संगणक विज्ञानाची पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पूर्ण केली.

घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व शिक्षणासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने आई-वडिलांनी (ट्रक चालक) ओव्हरटाईम काम करायला सुरुवात केली. आपल्यासाठी राबणाऱ्या आई-वडिलांना तो बघत होता. या स्थितीवर मात करायचं त्यानं ठरवलं. दिवस-रात्र अभ्यास करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले.

त्याने समविचारी मित्रांना सोबत घेत ध्येय फाउंडेशनची स्थापना केली. वार्डातील पंचशील बुद्ध विहारात पंचशील अकादमी सुरू केली. या अकादमीच्या माध्यमातून आतापर्यंत 250 हुन अधिक मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करून त्यांना उच्च शिक्षणाचे धडे त्याने दिले.

त्याने आजवर घेतलेल्या कष्टाला आता सन्मान मिळाला आहे. इंग्लंड येथील जगातील नामांकित एडिनबर्ग विद्यापीठ स्कॉटलंड येथे "सामाजिक शिक्षण तसेच डेटा असमानता आणि समाज' या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी जयची निवड झाली आहे.

या विद्यापीठाचा जगातल्या पहिल्या १५ विद्यापीठात समावेश होतो. जयला महाराष्ट्र शासनाची राजर्षी शाहू महाराज परदेशी उच्चशिक्षण शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या पुढील वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीतून होणार आहे. जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली की प्रतिकूल परिस्थितीतही उंच भरारी घेता येते, हे जयने दाखवून दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Shirur Loksabha: निकालाआधीचं विजयाचा विश्वास! पिंपरी चिंचवडमध्ये झळकले अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे बॅनर

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

SCROLL FOR NEXT