नाव न घेता जरांगेपाटलांचा फडणवीसांवर आरोप Google
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना वाचवण्यसाठी छुपा अजेंडा, जरांगे पाटलांचा कुणावर निशाणा?

Manoj Jarange: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते पुण्यात बोलत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय गुंड मित्राला वाचवण्यासाठी छुपा अजिंडा वापरला जातोय, असा घणाघाती आरोप जरांगे यांनी केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला काही महिने उलटले तरीही एक आरोपी अद्याप फरार आहे. सरपंच हत्या प्रकरणातील मास्टर माईंड वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंच्या अगदी जवळचा अन् विश्वासू आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहेच, त्यात मराठा आरक्षणासाठे लढणारे मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली. याप्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते पुण्यात बोलत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय गुंड मित्राला वाचवण्यासाठी छुपा अजिंडा वापरला जातोय, असा घणाघाती आरोप जरांगे यांनी केलाय. खोट्या सरकारच्या प्रतिनिधींनी अजिंडा राबवल्यामुळे धनंजय मुंडे यांना आरोपी ठरवले गेले नाही. जर मुंडे यांना आरोपी ठरवले गेले असते, तर त्यांना शिक्षा होऊ झाली असती. मात्र, त्यांचे राजकीय मित्र वाचवण्यात यशस्वी झाले. खून, खंडणी आणि जमिनी बळकविण्याचे घटनाक्रम घडल्यास, त्यांच्या टोळीला सुट्टी मिळणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

संतोष देशमुख प्रकरणाला दोन महिने उलटले, पण अद्याप चार्जशीट दाखल होणार नाही अशी अपेक्षा होती. त्यात फोडाफोडी होण्याची शक्यता होती, म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीच्या आधीच चार्जशीट दाखल केली गेली, ज्यामुळे आता धनंजय मुंडे सहआरोपी होण्याची शक्यता होती. तरीही, या प्रकरणात मुंडे वाचले आहेत.

छुपा राजकिय अजिंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला, मात्र तुमच्या पक्षाच्या प्रामणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाहीत, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT