8th Std Student Jumps to Death in School Saam
महाराष्ट्र

तिसऱ्या मजल्यावर गेली अन् ८वीत शिकणाऱ्या आरोहीनं उडी मारली; रक्ताच्या थारोळ्यात लेकीला पाहून वडिलांना धक्का | Jalna

8th Std Student Jumps to Death in School: जालन्यात सकाळी साडेसातच्या सुमारास आठवीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

Bhagyashree Kamble

जालन्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थिनीनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास तेरा वर्षीय मुलीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आयुष्य संपवलं. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आरोही दीपक बिडलान (वय वर्ष १३) असे मयत मुलीचे नाव आहे. ती जालना शहरातील सिटीएमके गुजराती विद्यालयामध्ये शिकत होती. आरोही आठवीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. तिची सकाळची शाळा होती. सकाळी साडेसातच्या सुमारास आरोही शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तिनं आत्महत्या केली.

आत्महत्या केल्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आरोहीला वाचवण्यासाठी गेले. तिला तातडीने रूग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे आरोही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, आरोहीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोहीच्या कुटुंबाला धक्काच बसला. दरम्यान, आरोहीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोहीनं शाळेतील विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा गंभीर आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला. दरम्यान शालेय व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्याचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: मायावी राहूच्या गोचरमुळे 'या' राशींना मिळेल प्रेम अन् पैशांचं घबाड

महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध, राज ठाकरेंकडे पुरावे, मनसे कोर्टात जाणार

महापालिकेचा महारणसंग्राम! मित्रपक्ष आमने-सामने; भाजप–अजित पवार गटात तुंबळ हाणामारी

Maharashtra Live News Update: शहाजी बापू पाटील यांची मुंबईत सोमवार पासून तोफ धडाडणार

Dark Circles: डोळ्यांखाली डार्क सर्कल झालेत? मग या सोप्या घरगुती उपायाने डार्क सर्कल होतील कायमचे दूर

SCROLL FOR NEXT