Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?; नातेवाईकांचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Jalna Ambad News : जालन्याच्या अंबड तालुक्यातील करंजळा या गावात हि घटना घडली आहे. या घटनेत कृष्णा आमटे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या केल्याचे कळताच नातेवाईकांनी धाव घेत रुग्णालयात दाखल केले.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालन्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी एसबीआय बँकेतील व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. 

जालन्याच्या अंबड तालुक्यातील करंजळा या गावात हि घटना घडली आहे. या घटनेत कृष्णा आमटे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या केल्याचे कळताच नातेवाईकांनी धाव घेत रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कृष्णा आमटे याने बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जफेडीसाठी कृष्णा याला बँकेच्या अधिकारी त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

यानंतर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत कृष्णाचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणला. नातेवाईकांनी गेल्या चार तासापासून गोंदी येथील पोलीस ठाण्यामध्ये मृतदेह ठेवला आहे. यामुळे पोलीस स्थानकात प्रचंड गोंधळ उडाला आहे. बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नातेवाईकांनी यावेळी बँक व्यवस्थापक विरोधात घोषणाबाजी देखील केली. 

मागील चार तासांपासून नातेवाईकांचे आंदोलन सुरु असून जोपर्यंत शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक भूमिका नातेवाईकांसह करंजळा गावकऱ्यांनी घेतली आहे. या सर्व वातावरणामुळे पोलीस स्टेशन परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT