Jalna Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा कहर; अतिवृष्टीचा २ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Jalna News : जालना जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरु असून यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून साधारण अडीच लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर माजविला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान जालना तालुक्यात असून कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

साधारण महिनाभरापासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. काही भागांना तर जोरदार तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात वित्त हानीसोबत जीवितहानी देखील झाली आहे. प्रामुख्याने मुसळधार पावसाचा अधिक फटका हा शेती पिकांना बसला असून यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात देखील पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. 

बाधिक क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता 
जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा तब्बल २ लाख ४७ हजार ५४० हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान जालना तालुक्यामध्ये झाला असून कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात आकडेवारी समोर आली आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असे आहे नुकसान 

१ सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंतचा नुकसानीचा अहवालानुसार अतिवृष्टीचा २ लाख ४७ हजार ५४० हेक्टर वरील पिकांना फटका बसला जालना तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६६ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यानंतर अंबड तालुक्यात ५३ हजार ७१० हेक्टर, घनसावंगी ४१ हजार २९ हेक्टर, बदनापूर ४५ हजार २०४ हेक्टर आणि परतूर तालुक्यात ४० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला काय खायचे? फक्त २ पदार्थांपासून झटपट बनवा 'हा' पराठा

Maharashtra Live News Update: ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

Shiny Hair: सुपर शाइनिंग केसांसाठी ट्राय करा हा घरगुती हेअर मास्क, दोन आठवड्यात दिसेल फरक

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

SCROLL FOR NEXT