Manoj Jarange On Devendra Fadnavis  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठ्यांनो, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन

Manoj Jarange Patil Criticized BJP And Devendra Fadnavis: जरांगे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस यांना मला गुन्ह्यामध्ये अडकवायचे आहे.', असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.

Priya More

'तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका.', असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आमरण उपोषण सोडले. मराठा समाज बांधवांच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस यांना मला गुन्ह्यामध्ये अडकवायचे आहे.', असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'माझा कशात काही संबंध नाही. मी कुठेच गुंतत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शाळा केली आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला. माझ्यासाठी आमदारकी आणि मंत्री माझा समाज आहे. जात म्हणजे तुम्हाला नाही कळणार. मला पैसा नकोय. हे लोकं मला मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी फसवणूक केली म्हणून मला गुन्ह्यात गुंतवायचे आणि मला जेलमध्ये टाकायचे आहे. एसआयटीमध्ये गुंतत नाही, मी ऐकत नाही, मी मराठा समजाची निष्ठा सोडत नाही. मी मराठ्यांच्या पोरांना मोठं करण्यासाठी ही दुश्मनी अंगावर घेतली आहे.'

'मला जेलमध्ये टाकायचे आणि जेलमधील लोकांच्या हातून मला मारून पण टाकायचे. मला जर जेलमध्ये टाकले तर भाजपचे एकही सीट तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आले नाही पाहिजे. मी मेलो तरी चालेल पण तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तरी भाजपचे एकही सीट येऊन देऊ नका.', असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. तसंच, 'इथून पुढं सावध राहा. काय करायचे आहे या देवेंद्र फडणवीस यांना ते करू द्या. कारण कोर्ट आणि पोलिस त्यांच्या हातात आहे. पण कोणालाही घाबरु नका.', असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले. संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. शिवाय ७ ऑगस्टला सोलापूरमधून सुरू होणाऱ्या पुढच्या दौऱ्या संदर्भातही त्यांनी नियोजन केलंय. ७ ते १३ ऑगस्टदरम्यान ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सोलापूरातून या दौऱ्याला सुरूवात होणार असून नाशिकमध्ये त्याचा समारोप होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT