Manoj Jarange Patil : मध्यरात्री ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले अन् सलाईन दिली; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून उपोषण थांबवण्याची घोषणा; सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम
Manoj Jarange Patil VideoSaam Tv
Published On

सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन मी माझं उपोषण स्थगित करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून उपोषण थांबवण्याची घोषणा; सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, उपोषणामुळे पोटात तीव्र कळा; मराठा बांधव चिंतेत

मनोज जरांगे म्हणाले, "मंगळवारी रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हात पाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. माजाच्या मायेपोटी मी उपचार घेतले. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असं समाजाचं म्हणणं होतं. आमरण उपोषण मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे".

आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरतं. पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही. मी सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. त्यामुळे आज दुपारी मी माझं उपोषण सोडणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा करताना राज्य सरकारला पुन्हा १ महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या १३ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा उपोषण सुरू करणार, असा इशारा जरांगे यांनी दिलाय.

दरम्यान, एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. यावर देखील जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार दाखवण्यासाठी आम्ही नाटकाचे काम केलं होतं. त्यात आम्हाला तोटा झाला. नाटकातील पैसे काही जणांनी चोरले. त्यात माझा तिळभरही हात नव्हता, असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली.

मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून उपोषण थांबवण्याची घोषणा; सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम
Nashik News : मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्ग पाडला होता बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com