Nashik News : मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्ग पाडला होता बंद

Nashik Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्ग पाडला होता बंद
Shivsena Nashik NewsSaam TV
Published On

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही कार्यकर्त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्ग पाडला होता बंद
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांना तातडीने अटक करा, ईडी-सीबीआयची चौकशी लावा; संजय राऊतांची मोठी मागणी

गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. नाशिक मुंबई महामार्गाच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) गटाकडून मंगळवारी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं होतं.

महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास घोटी टोल नाका बंद पाडला होता. या आंदोलनामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

यावेळी शिवसैनिकांनी अनेक वाहने विनाटोल सोडून दिली. वाहतूक खोळंबल्याने आंदोलक आणि वाहनधारकांमध्ये वाद झाले. अखेर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने ३१ जुलैपर्यंत रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन शिवसैनिकांची समजूत काढली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा घोटी पोलिसांनी ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. जमाव बंदीचे आदेश असताना देखील जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्ग पाडला होता बंद
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, उपोषणामुळे पोटात तीव्र कळा; मराठा बांधव चिंतेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com