Manoj Jarange Patil: सरकारला पुन्हा 13 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम; काय असेल जरांगेंची पुढची भूमिका?

Manoj Jarange Patil On Reservation: मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले होते. त्यांची काल रात्री 23 जुलै रोजी तब्येत खालावली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज दुपारी 12 वाजता ते उपोषण सोडणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. 13 ऑगस्टपर्यंत एक महिन्याची सरकारला वेळ जरांगेंनी दिलीये. काल रात्री 23 जुलै रोजी मनोज जरांगेंची तब्येत खालावली होती, त्यांनी उपचार घेतले आणि आज सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन जरांगे उपोषण सोडणार आहेत.दरम्यान मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत जरांगेंनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढची जरांगेंची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com