Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : मंगल कार्यालयाच्या स्वयंपाक घरात आणि खोलीत भरते शाळा; जालना महापालिका शाळेचे वास्तव

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे

जालना : राज्यातील जिल्हा परिषद शाळांना हक्काच्या खोल्या नसल्याने भाड्याच्या खोलीत किंवा उघड्यावर शाळा भरविल्या जात असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्यानुसार जालना महापालिका शाळेचे देखील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जालन्यामध्ये चक्क मंगल कार्यालयाच्या स्वयंपाक खोलीत शाळेचे वर्ग भरविल्याचे समोर आले आहे. 

जालना (Jalna) शहरातील शकुंतला नगरमध्ये मंदाकिनी मंगल कार्यालयात चिमुकल्यांना ज्ञानदानाचे काम सध्या सुरू आहे. जालना शहरातील शकुंतला नगरातील महानगरपालिकेच्या असलेल्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. तर या शाळेत एकूण १७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेला इमारत नसल्यामुळे स्वयंपाक घरात चौथीचा वर्ग, स्टेजवर पाचवीचा वर्ग तर वधू पक्षाच्या खोलीत आठवीचा वर्ग भरवण्याची वेळ शिक्षकांवर आली. 

तर घरात भरते शाळा 

मंगल कार्यालय लग्न किंवा इतर सोहळ्यासाठी बुकिंग करण्यात आले असल्यास त्या दिवशी शाळा (School) शिक्षकांच्या घरात भरवली जाते,  असं देखील वास्तव समोर आले आहे. वर्षभरापूर्वी जालन्याच्या नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले असले तरी शिक्षणाच्या बाबतची अनास्था आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

SCROLL FOR NEXT