सागर निकवाडे
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीचा कुंड्यापाडा येथील संतापजनक अशी घटना समोर आली आहे. गावाकडं जायला रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी आदिवासी महिलेला बांबूची झोडी करून त्यातून रुग्णालयात नेले जात होते. मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या जिल्ह्यातील अनेक गावे, पाडे डोंगराळ भागात आहेत. गावांपर्यंत पोहचण्यासाठी आजही येथे कच्चा किंवा पक्का रस्ता तयार झालेले नाहीत. यामुळे या गावातील नागरिकांना दूरपर्यंत पायी चालत जावे लागत असता. अशा परिस्थितीत येथे आरोग्य सेवा देखील पोहचणे कठीण झाले आहे. यामुळे कोणाला रुग्णालयात न्यायचे झाल्यास बांबूची झोडी करून त्यात टाकून न्यावे लागत असते. असाच प्रकार आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला असून प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्यानंतर या महिलेला झोळीतून नेले जात असल्याची चित्र पाहण्यास मिळाले.
वेळेवर दवाखान्या पर्यंत पोहचता न आल्याने रस्त्यातच प्रसूती
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीचा कुंड्यापाडा येथील अल्का आकाश पावरा या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. यानंतर बांबूची झोळी करून रुग्णालयात नेले जात असतानांच रस्त्यातच तिची प्रसुती झाली. बालकाचे वजन फक्त 1 किलो 400 ग्राम असून बालक आणि त्या महिलेची तब्येत चांगली असून नवजात बालकासह मातेला नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.दरम्यान एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे चित्र आहे. वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहे. आता तरी प्रशासनाने या कडे लक्ष देऊन रस्ते तयार करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.