Lightning Strike : वीज पडून धुळे, जळगाव जिल्ह्यात पशुधनाचा मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Dhule Jalgaon News : शेतकऱ्याचे पशुधन निसर्गाच्या कोपामुळे मृत्युमुखी पडल्यामुळे शेतकऱ्याकडे आता मशागतीच्या काळात पशुधन गेल्याने मोठ संकट उभ ठाकल आहे
LIghtning Strike
LIghtning StrikeSaam tv

धुळे/जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. या दरम्यान वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या असून धुळ्यातील शिरपूरच्या अभानपूर येथे वीज पडून दोन बैल तर जळगाव जिल्ह्यातील शिरसोदे येथे वीज पडून पंधरा मेंढ्यांचा मृत्यू झाला. 

LIghtning Strike
Taloda News : पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून; तळोद्यातील कुलीडाबर गावात प्रथमच होत होता रस्ता

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अभानपूर येथे रविवारीच्या रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. दरम्यान अभानपूरपासून एक किमी अंतरावरील रतु पोलाद भिल या शेतकऱ्याच्या बैलांच्या गोठ्यावर (LIghtning Strike) वीज पडल्याने त्यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामात शेतकऱ्याचे पशुधन निसर्गाच्या कोपामुळे मृत्युमुखी पडल्यामुळे शेतकऱ्याकडे आता मशागतीच्या काळात पशुधन गेल्याने मोठ संकट उभ ठाकल आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात येत आहे.

LIghtning Strike
Jintur News : पंकजा मुंडे विषयी आक्षेपार्ह पोस्ट; जिंतूरमध्ये कडकडीत बंद

जळगाव जिल्ह्यात पंधरा मेंढ्या मृत्यू
जळगाव
: जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात देखील रात्री झालेल्या (Jalgaon) पावसाने वीज कोसळल्यामुळे शिरसोदे येथे पंधरा मेंढ्या दगावल्या आहेत. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसात शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये विज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या व एक बकरी दगावली असून मेंढपाळला सुद्धा विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले. मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com