Taloda News : पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून; तळोद्यातील कुलीडाबर गावात प्रथमच होत होता रस्ता

Nandurbar News : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील या गावाला जोडणारा पक्का रस्ता अद्यापपर्यंत नव्हता. गावात जाण्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते
Taloda News
Taloda NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते. मात्र जोरदार पडलेल्या पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला आहे. 

Taloda News
Sambhajinagar News : अंत्योदय रेशन कार्ड धारकांच्या घरावर लागणार पाट्या; राज्य सरकारच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना

तळोदा (Taloda) तालुक्यातील कुलीडाबर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अतिदुर्गम भागातील सुमारे ३०० लोकसंख्या असणारे गाव आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील या गावाला जोडणारा पक्का रस्ता अद्यापपर्यंत नव्हता. गावात जाण्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते. गावात रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. (Nandurbar) आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः याबाबत लक्ष घालून रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी १३ लाख ४४ हजार ४३४ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. 

Taloda News
Pavana Dam : मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला; पवना धरणात बुडून मृत्यू

कुलीडाबर या गावाला जोडणारा रस्ता मंजूर झाला असून केवलापाणी ते कुलीडाबर, पालाबार यांना जोडणाऱ्या रस्त्याचे माती काम करण्यात येत होते. गावाला जोडणारा रस्ता तयार होणार असल्याने ग्रामस्थांनी सुटकेच्या निश्वास सोडला. मात्र, पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याने पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain) व पाण्याच्या तीव्र प्रवाह यामुळे रस्ता पूर्णपणे खोदला गेला आहे. रस्त्यावर पायी चालणे जिकरीचे झाले असून सर्वत्र दगड गोटे देखील पसरले आहेत. अशा परिस्थितीत देखील सकाळच्या सुमारास काही ग्रामस्थांनी गावाकडे अडकलेल्या आपली मोटरसायकल पक्या रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना मोठे तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात या गावापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींच्या सामना करावा लागणार आहे. दरम्यान या गावाला जोडणारा बारमाही पक्का रस्ता निर्माण करावा; अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रस्त्या अभावी या गावात कोणतेही मोठे वाहन पोहोचत नसून त्यामुळे या गावातील पाणी प्रश्न व इतर प्रश्न देखील जटील बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com