Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

IPS अधिकाऱ्याची धडक कारवाई! वेशांतर करुन नदीत उतरला, वाळू माफियांना दणका; २ कोटींचा मुद्दमाल जप्त

Jalna News : जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने मठ पिंपळगाव येथे वाळू माफियांचे २ जेसीबी आणि ५ हायवा जप्त केले आहेत. या कारवाईत २ कोटी ३५ लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

Yash Shirke

अक्षय शिंदे-पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Jalna Crime News : जालना जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने वेशांतर करुन वाळू माफियांवर कारवाई केली आहे. त्यांनी नदी पात्रात २ जीसीबी आणि ५ हायवा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. ही घटना अंबड तालुक्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथे दुधना नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याचे स्थानिक पोलिसांना समजले. त्यानंतर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांनी वेशांतर करत थेट दुधना नदीचे पात्र गाठले. नदीच्या पात्रातून अवैध्यरित्या वाळू उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर सिद्धार्थ बारवाल यांनी दुधना नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई केली. सिद्धार्थ यांनी तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात २ जेसीबी आणि ५ हायवा पोलिसांच्या हाती असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांची कौतुक होत आहे.

जालन्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून वाळू माफियांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. या माफियांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कबर कसली आहे. ठिकठिकाणी छापे मारत पोलीस माफिया टोळ्यांवर कारवाई करत आहेत. पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने परिसरातील माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT