Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय; नोकऱ्या, सोलारसाठी कोट्यवधींची मंजूरी अन् बरेच काही

Maharashtra Cabinet Decision : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी मत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Cabinet ministers of Maharashtra
Cabinet ministers of Maharashtra
Published On

Cabinet ministers of Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ही बैठक वादळी झाल्याचं समजतेय. मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दांडी मारल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी मत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले सहा महत्त्वाचे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे. फडणवीस सरकारकडून आज वादळी निर्णय घेण्याची शक्यता होती, डान्स बारच्या कायद्यात बदल करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता होती, पण तसा कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला नाही.

Cabinet ministers of Maharashtra
Uddhav Thackeray : कोकणानंतर ठाकरेंना संभाजीनगरातही धक्का, महत्त्वाचा शिलेदार साथ सोडणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

• अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)

• सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)

Cabinet ministers of Maharashtra
Maharashtra Politics : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, आदित्य ठाकरेंच्या विश्वासू नेत्याला फोडलं?

• राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

• जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

• पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com