Uddhav Thackeray shiv sena : गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरूच आहे. उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा फटका कोकणात बसलाय. राजन साळवी यांच्यासारखा खंदा शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत गेला. त्यात आता छत्रपती संभाजीनगरातही ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र आहे. ठाकरेंचे संभाजीनगरातील महत्त्वाचे नेते मानले जाणारे राजू शिंदे जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजू शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभेनंतर जुलै महिन्यात भाजपच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये राजू शिंदे यांनी जाहीर प्रवेश केला होता. आता ते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. राजू शिंदे हे भाजपमध्ये परतले तर उद्धव ठाकरे गटाला आणखी एक झटका आहे.
दोन दिवसापूर्वीच सिल्लोडचे सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांनीही निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचे शिवबंधन बांधले होते. आता राजू शिंदे परतण्याची शक्यता वर्तविली जातेय. राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर पश्चिम या राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता आठ महिन्यानंतर पुन्हा ते भाजपवाशी होतील असं सध्या दिसत आहे.
विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या काही भागांमध्ये प्रभाव असलेले राजू शिंदे हे भाजपमध्ये आल्यानंतर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी मदत होऊ शकते, हा विचार करून राजू शिंदे यांच्या घरवापसीसाठी भाजपाने गळ टाकला आहे. आगामी मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाजपची भूमिका आहे. त्यामुळे भाजपमधील एक गट राजू शिंदे यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या तयारीत तर काहींचा विरोध असल्याचं बोलले जात आहे. यापूर्वी राजू शिंदे यांनी ३ वेळा भाजपला रामराम ठोकला आहे. आणि पुन्हा परत भाजपमध्ये आले. त्यामुळं मूळ भाजपचे असल्यानं ते पुन्हा घर वापसी करणार यावर आमचा विश्वास असल्याचे काही भाजपचे स्थानिक नेते सांगतायत..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.