Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : माती काढताना विहीर खचली; शेतकऱ्याचा मृत्यू, जालन्यातील देळेगव्हाण येथील घटना

Jalna News : गावालागूनच शेत असल्याने गेल्या कित्येक दिवसापासून त्यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू असल्याने विहीर बांधण्यास अडचण येत असल्याने त्यांनी खोदकाम करून लगेच विहीर बांधण्यास सुरवात केली होती

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यात शेतातील विहिरीचे खोदकाम सुरु असताना विहिरीत असलेल्या मलबा काढत असताना अचानक मातीचा मलबा खचला. यात विहिरीत असलेल्या शेतकऱ्याचा यात दबून मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील देलेगव्हाण गावात घडली आहे. 

जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण गावातील जिन्नसराव शेषराव बनकर (वय ५०) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान देळेगव्हाण येथील जिनासराव बनकर यांचे गावालागूनच शेत असल्याने गेल्या कित्येक दिवसापासून त्यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू असल्याने विहीर बांधण्यास अडचण येत असल्याने त्यांनी खोदकाम करून लगेच विहीर बांधण्यास सुरवात केली होती.  

अचानक मातीचा ढिगारा पडला 

विहरीचे बांधकाम प्रगतिपथावर असताना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकरी जिन्नसराव बनकर हे बांधकामाला अडचण येणारा विहिरीचा मलबा काढण्यासाठी विहिरीत उतरले होते. दरम्यान पाऊस पडल्यामुळे जमीन नरम झाल्यामुळे अचानक वरची बाजू खचून मातीचा मोठा ढिगारा विहरीत पडला. यामुळे मातीखाली दबले गेले.

लोखंडी सळई घुसली डोक्यात 

दरम्यान तोल जाऊन विहिरीच्या बांधकामावरील लोखंडी गज बनकर यांच्या डोक्यात घुसले. यामुळे गंभीर जखमी अवस्थेत ते जागेवरच बेशुद्ध पडले होते. हा प्रकार त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी गावकऱ्यांना बोलावून तत्काळ बाहेर काढले. यानंतर त्यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले. या घटनेमुळे परिवाराने एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT