Nashik Kumbh Mela : आमच्या जमिनींवर कुंभमेळा भरतो, आम्हाला डावलता कसे? सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच घुमला नाराजीचा सूर

Nashik News : १२ वर्षानंतर केवळ २० टक्केच जमीन भूसंपादित करण्यात आली. शेत जमिनीवर भूसंपादनाचे आरक्षण असल्याने शेतकऱ्यांना ना तिथे शेती करता येते, ना विकास. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरले
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaSaam tv
Published On

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याच्या नावावरून सुरू असलेला वाद मिटतो न मिटतो तोच आता नवा वाद निर्माण झाला. कुंभमेळा आमच्याच जमिनीवर भरतो, मात्र आम्हाला का डावलता? कुंभमेळ्यासाठी शेत जमिनी आरक्षित झालेल्या शेतकऱ्यांनी थेट सरकारला सवाल विचारत कुंभमेळ्याच्या नियोजन बैठकीत सहभागी करून घेण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 

नाशिक येथे होत असलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनातील जागेवर वेगवेगळ्या आखड्यांसाठी साधू ग्राम उभारले जातात. २०१२ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन आरक्षित करण्यात आली. मात्र १२ वर्षानंतर देखील केवळ २० टक्केच जमीन भूसंपादित करण्यात आली. शेत जमिनीवर भूसंपादनाचे आरक्षण असल्याने शेतकऱ्यांना ना तिथे शेती करता येते, ना विकास. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

Nashik Kumbh Mela
Sambhajinagar Jalgaon Highway : संभाजीनगर ते जळगाव मार्ग बारा वर्षांनंतरही पूर्ण होईना; अजिंठा लेणीवर जाणाऱ्या पर्यटकांना त्रास

जमिनीचा मोबदला देण्याची मागणी 

आगामी कुंभमेळ्याची जय्यत तयारी होत असून शाहीस्नानाच्या तारीख देखील निश्चित केल्या जाणार आहेत. असे असताना ज्यांच्या जमिनीवर कुंभमेळ्याचा धार्मिक उत्सव होतो, त्या शेतकऱ्यांनी आता आवाज उठवला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच जमिनीचा मोबदला देखील देण्याची मागणी १६३ शेतकऱ्यांनी केली. 

Nashik Kumbh Mela
Bhokardan : गतवर्षीच्या अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित; भोकरदन तालुक्यातील शेतकरी अडचणीत

१ जूनच्या बैठकीसाठी आमंत्रित नसल्याने शेतकरी नाराज 

सरकारने जमिनीचा रोख मोबदला द्यावा; तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावं, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. येत्या १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक होणार असून या बैठकीला शेतकऱ्यांना आमंत्रित न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com