Bhokardan : गतवर्षीच्या अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित; भोकरदन तालुक्यातील शेतकरी अडचणीत

Jalna Bhokardan News : मागील वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये महिन्यात गारपिटीसह मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. याचा फटका जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला देखील बसला होता
Jalna Bhokardan News
Jalna Bhokardan NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारध गावातील जवळपास दोनशे शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहे. या शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर देखील अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आहे. 

मागील वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये महिन्यात गारपिटीसह मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. अनेक भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा फटका जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याला देखील बसला होता. यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टी अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांच्या हलगर्जीपणामुळे गावातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही. 

Jalna Bhokardan News
Pimpri Chinchwad : गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेतून सुटका होताच गांजा विक्री; महिला आरोपी फरार, तिघेजण ताब्यात

तीन वेळेस कागदपत्र केले जमा 

भोकरदन तालुक्यातील पारध येथील गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र जमा केले आहे. उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र दिले. परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे आज पुन्हा तलाठी कार्यालयावर जाऊन तलाठी अमोल तळेकर यांना पासबुक झेरॉक्स व आधारकार्ड हे कागदपत्र जमा केले 

Jalna Bhokardan News
Sambhajinagar Jalgaon Highway : संभाजीनगर ते जळगाव मार्ग बारा वर्षांनंतरही पूर्ण होईना; अजिंठा लेणीवर जाणाऱ्या पर्यटकांना त्रास

शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा
पारध येथे 2024 मध्ये फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झालेल्या गारपीटमुळे मोठे नुकसान झालेले अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी तलाठीकडे तिसऱ्यांदा कागदपत्र जमा केले आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे गारपिटीच्या अनुदान रखडले. शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसांमध्ये अनुदान जमा झाले नाही; तर तलाठी कार्यालयात उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com