माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Devendra Fadnavis, Balasaheb Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित 'देवाभाऊ' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले.

Devendra Fadnavis uncle on Prime Minister post : "माझा पुतण्या आज ना उद्या देशाचा पंतप्रधान होईल," असा दृढ विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका (चुलते) बाळासाहेब फडणवीस यांनी आज व्यक्त केला. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित 'देवाभाऊ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस बोलत होते.

आपल्या भावना व्यक्त करताना बाळासाहेब फडणवीस म्हणाले, "माझा पुतण्या कायद्याचा (लॉ) गोल्ड मेडलविजेता आहे. त्याच्याकडे उत्तम वक्तृत्वशैली असल्याने तो राजकारणात येईल असा अंदाज मला आधीपासूनच होता. जीवनात अनेकदा कलाटणी मिळते. नागपुरातील एका प्रसिद्ध वकिलांकडे तो प्रॅक्टिस करत होता आणि त्यानंतर त्याने जनसंघात प्रवेश केला. तो जेव्हा घरी असतो, तेव्हा घरात अजिबात राजकारण आणत नाही; अगदी मोकळेपणाने वावरतो. त्यामुळेच माझा हा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान नक्की होईल, असे मला मनापासून वाटते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com