Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: रात्री जेवण करून शेतात गेले ते परतलेच नाही; पाऊस नसल्याने विवेचनेतून शेतकऱ्याची विहरीत उडी

रात्री जेवण करून शेतात गेले ते परतलेच नाही; पाऊस नसल्याने विवेचनेतून शेतकऱ्याची विहरीत उडी

लक्ष्मण सोळुंके

जालना : पाऊस पडत नसल्याच्या विवेचनेतून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. हसनाबाद पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव कोलते येथील शिवारातील घटना घडली आहे. रमेश त्रिंबक सोनवणे (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या (Farmer) शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

रमेश सोनवणे हे रात्री जेवण केल्यानंतर कुणाला काही न सांगता शेतात निघून गेले होते. ते रात्री घरी परत न आल्याने त्याच्या आईने व नातेवाईकांनी (Jalna News) गावात त्यांचा शोधा घेतला. यानंतर त्यांना कुठलीच माहिती मिळत नसल्याने गावातील नागरिकांनी सकाळी त्यांचा शोधाशोध केली. या दरम्‍यान त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामपंचायत सरपंचानी घटनेची माहिती तात्काळ हसनाबाद पोलिसांना दिली.

उसनवारीच्‍या पैशातून बियाणे, खत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढून घटनेचा पंचनामा करत मृत्यूची नोद केली आहे. जून महिन्याचे तीन आठवडे उलटून ही पाऊस पडत नसल्याने हात उसने आणि नातेवाईक यांच्याकडूज घेतलेल्या पैशात घेतलेली महागडी बी-बियाणे आणि खत त्यांनी भरून ठेवली होती. वेळेत पाऊस न पडल्याने वेळेत पेरणी न झाल्याने पैसे फेडायचे कसे? या चिंतेत शेतकरी असल्याची माहिती नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिली आहे. याचं विवेचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT